महाराष्ट्रात जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वर्षे आहे, तर तीच वयोमर्यादा केंद्रात ६० वर्षे आहे.
महाराष्ट्रातही हि वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. यावरील
उत्तरात बडोले म्हणाले कि राज्यात जेष्ठ नागरिकांचे वय ६० करण्याचा निर्णय एका महिन्यात घेण्यात
येईल. शिवाय जेष्ठ नागरिक धोरणाचीही अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच निराधार लोकांच्या धर्तीवर
नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येतील. एका घरात दोन जेष्ठ नागरिक असतील तर १२०० रुपये
ऐवजी ९०० रुपये दिले जातील. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांवर कारवाई केली जाईल आणि
मानधन वाढवण्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री महोदय म्हणाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews